ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपमध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही यादी देतो – जयंत पाटील

अहमदनगर दि.२९ सप्टेंबर – भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले असता जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी हा सवाल केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपमध्ये गेले आहेत त्यांचं काय झालं हे एकदा ईडीने जनतेला सांगावे असेही जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत मनीलॉड्रींगचा प्रकार नाही. त्यांच्या जावयाने कर्ज काढून त्या जमीनीचा व्यवहार केला आहे. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही लोकांनी कारखान्यात पैसे जमा केले आहेत तरीही मनीलॉड्रींगचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला गेला आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. अनिल देशमुख यांच्यावरही पैसे मागितल्याचा आरोप झाला. त्यांनी पैसे घेतले नाही असे अधिकारी भुजबळ व संजय पाटील या अधिकाऱ्यांनी सांगितले असे स्पष्ट केले आहे याबाबतही जयंत पाटील यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!