पुणे : पुणे महापालिकेने मांजर पा ळणाऱ्यासाठी एक नियमावली बनवली आहे. पुण्यात आता जर तुम्हाला मांजर पाळायची असेल तर महानगर पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या साठी पुणे महानगर पालिकेने खास प्रस्ताव सादर केला असून या प्रस्तावाला स्थायी समितिने मंजूरी दिली आहे. या बाबतचा प्रस्थाव आरोग्य विभागाने दिला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पुणे पालिकेच्या या प्रस्तावाच्या स्वागत केले आहेत तर काही लोकांनी टीका केली आहे. आदि सर्व सामान्य जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्या नंतर मांजर कुत्रे पाळण्यासाठी नियम कर अशी टीका सामान्य पुणेकरांनी म्हंटले आहेत.
महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. या पूर्वी केवळ कुत्रा आणि घोडा पाळायचा असेल तर परवाना घ्यावा लागत होता. त्यात आता मांजराचा देखील समावेश करण्यात आला आहे. मांजर पळल्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. पालिकेने मांजराची नोंदणी करण्यासाठी वर्षाला ५० रुपये आकारणार आहे.
ज्यांना मांजर पाळायची आहे, त्यांना हा परवाना घेण्यासाठी रहिवासी पुरावा, मांजरीचे लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो ही कागदपत्रे महानगर पालिकेला सादर कारवाई लागणार आहे. परवण्याच्या ५० रुपयांच्या शूल्कशिवाय अतिरिक्त २५रुपये शुल्क देखील आता मांजरप्रेमींना भरावे लागणार आहेत