बीड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यापासून लढा उभा केला असून गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात त्यांनी सभेचा तडाखा सुरु केला असून मात्र त्यांच्या प्रकृती बिघडली असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे पण त्यांनी मात्र चौथ्या टप्प्यातील नियोजित सभा घेण्याचा हट्ट धरला आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा राज्यातील तिन टप्प्यातही त्यांनी राज्याचा दौरा केला आहे. सध्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, त्यांच्या तातडीने वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत. मात्र, जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांची आवश्यक ती तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते. आता या डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. असे असले तरी मनोज जरांगे पाटील यांनी नियोजित सभांना उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चौथ्या टप्प्यात राज्याचा दौरा सध्या मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्यांची प्रकृती खालवल्यामुळे सोमवारी त्यांची बीडमधील अंबेजोगाईत सभा सुरु असताना प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना अंबेजोगाईच्या थोरात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा देखील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. असे असतांना आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.