नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे परदेश दौऱ्यावर असून त्यांनी व्हर्जिनियातील हेरंडन येथे भारतीय समुदायाच्या लोकांशी झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी या सर्व गोष्टी सांगितल्या.
राहुल गांधी म्हणाले कि, आता घाबरू नका. भीती गेली. भाजप आणि पंतप्रधान मोदींनी एवढी दहशत पसरवली, छोट्या व्यावसायिकांवर एजन्सींचा दबाव निर्माण केला, सेकंदात सर्वकाही गायब झाले. ‘ही भीती पसरवायला त्यांना अनेक वर्षे लागली आणि ती काही सेकंदात नाहीशी झाली. संसदेत मला पंतप्रधान समोर दिसतात. मी तुम्हाला सांगू शकतो की मोदींचे विचार, 56 इंची छाती, थेट देवाशी संबंध, हे सर्व आता संपले आहे, हे सर्व आता इतिहास बनले आहे.
व्हर्जिनियातील हेरंडन येथे भारतीय समुदायाच्या लोकांशी झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी या सर्व गोष्टी सांगितल्या. काँग्रेस नेते 3 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या दिवशी, मंगळवारी ते वॉशिंग्टनला पोहोचले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. यापूर्वी रविवारी ते अमेरिकेतील टेक्सास येथे गेले होते. विमानतळावर पोहोचल्यावर इंडियन ओव्हरसीज काँग्रेस आणि अनिवासी भारतीयांनी त्यांचे स्वागत केले.