पुणे : वृत्तसंस्था
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रकरणाची हत्या सुनावणी पूर्ण झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरू होती. ती पूर्ण झाल्याने शुक्रवारी (दि. १०) याप्रकरणी निकाल लागणार असून, आरोपींना काय शिक्षा होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपविला. १५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. यातील पुनाळेकर आणि भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. सीबीआयने या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाने दोन साक्षीदार न्यायालयात उभे केले.