ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘दृश्यम ३’ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : वृत्तसंस्था

दुश्यम चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दुश्यमच्या दोन्ही भागांच्या अभूतपूर्व यशानंतर आता दृश्यम फ्रँन्चाईचा तिसरा भाग दृश्यम ३ ला हिरवा सिंग्लन मिळाला असून, लवकरच या चित्रपटावर काम करण्यास सुरूवात केली जाणार आहे. याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी बॉलीवूड हंगामाला माहिती दिली आहे. नॉर्मा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडने डिजिटल १८ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत दृश्यम ३ ची निर्मिती केली जाणार आहे. अजय देवगण पुन्हा एकदा दृश्यम ३ मध्ये त्याचे कल्ट पात्र विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

२९ मे २०२५ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेबीच्या लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्सच्या कार्यक्रमात दृश्यम ३  चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दृश्यम ३ मध्ये अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार आहेत.

अजय देवगण पुन्हा एकदा त्याच्या विजय साळगावकर या कल्ट पात्रामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दृश्यम ३ हा २०२६ मधील रिलीज केला जाऊ शकतो, अशी माहिती आहे. या चित्रपटात अजय देवगण याच्या व्यक्तिरिक्त कोणकोण असणार आहे, की आधीच्या चित्रपटातील पात्र पुन्हा एकदा पाहायला मिळणार याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!