टाळेबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुधनीत तीन व्यापाऱ्यांवर कारवाई; कारवाई आणखी तीव्र करणार : मुख्याधिकारी
अक्कलकोट, दि.३ : राज्यात सर्वत्र कडक लॉकडाऊन असतानाही दुकाने उघडल्या प्रकरणी दुधनी (ता. अक्कलकोट) येथे तीन व्यापाऱ्यावर नगरपरिषदेने कारवाई केली आहे.चोरून जर दुकान कुणी उघडे ठेवत असेल तर यापुढे त्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दिला आहे.राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे तथापि काही व्यावसायिक व नागरिक याकडे गांभीर्याने
न बघता टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सहआयुक्त अनिकेत मनोरकर यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तरीही काही लोक प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांच्यावर आता दुकाने सील करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यात प्रशासनामार्फत कार्यालयीन कर्मचारी सी. एस.कोळी, आर. एस.अत्ते, सी.बी. पाटील, शांतमल चिंचोळी, मौला गायकवाड यांचे पथक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यासोबत दुधनी औटपोस्ट पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल श्री जाधव, सुरेश लामजाने हे सहकार्य करत आहेत. शासन आदेशाचे पालन न करता व्यवसाय सुरू ठेवणे, विनाकारण गर्दी करणे इत्यादी नियमांचे उल्लंघन केले म्हणून तीन व्यापार्यावर कार्यवाही करून दुकाने सील करण्यात आली आहेत. शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांना आपले आरोग्य अबाधित राहण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनाचे अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी केले आहे.