ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनीत मृत्यजय दूताना प्रशिक्षण,प्राथमिक उपचारचेही दिले प्रशिक्षण

 

गुरुषांत माशाळ

दुधनी दि. ३१ मार्च: अपघात प्रसंगी अपघात ग्रस्तास प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. हायवेवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात तरुण पिढीचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. अपघात प्रसंगी अपघात ग्रस्ताकडे जे गोल्डन हवर्स (सोन्याचे तास ) असतात अशा प्रसंगी कोणाची तरी मदत मिळाली की त्याचा जिव वाचतो. हेच जिव वाचविण्याचे काम मृत्यूजय दूताना करावयाचा आहे. जो संकटात धावून येतो त्याला देवदूत म्हणतात, जो मुत्यू प्रसंगी धावून येतो त्यास मृत्यूजय दूत म्हणतात. याकरिता प्रत्येकानी प्रमाणीकपणे काम करावे असे आवाहन हवालदार दतात्रय घंटे यानी केले.

दुधनी येथील पोलिस चौकी मध्ये मृत्यूजय दूताना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी मार्गदर्शन करताना महामार्ग वाहतुक पोलिस पाखणीचे हवालदार दत्तात्रय घंटे बोलत होतो. या प्रसंगी प्रथमोपचार विषयी मार्गदर्शन करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र दुधनी येथील डॉ.एम.एस. पाटील, हे होते व दुधनी दूरक्षेत्र अमलदार संजय जाधव यांची प्रसंगी प्रमख उपस्थीती होती.

हायवेवर किंवा अन्यत्र कुठे झाला की, लोक पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून मदतीसाठी पुढे येत नाहीत या स्थितीत अपघातातील जखमींना वेळेवर मदत मिळावी यासाठी १ मार्च २०२१ रोजी राज्यात हायवे मृत्युजय दूत योजना सुरू करण्यात आली. त्याच अनुषंगाने

डी.जी. ऑफिस च्या आदेशानुसार महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी अंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील दुधनी या गावातील मृत्यूजयदूताना प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी डॉ. एम.एस. पाटील यांनी हायवेवर कोणत्याही प्रकारचे अपघात झाला की यावर कसा प्राथमिक उपचार करायचा या संदर्भात सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक देखील करुन दाखविला.  यावेळी मृत्यूजयदूत म्हणून सुनिल अमाणे, राजकुमार खंडाळ, सातलिंग गुळगोंडा, प्रकाश म्हेत्रे, राजू गवंडी यांची नेमणूक करण्यात आली.

अपघात झाल्यास त्यांना तातडीने दवाखान्यात पोहचवणे, व या घटनेसंदर्भात संबधीत नजीकच्या महामार्ग पोलीस मदत केंद्रात कळविणे, या अशा कायदेविषयक मार्गदर्शन हवालदार घंटे महामार्ग मदत केंद्र पाकणी यांनी सविस्तर पणे उपस्थित मृत्यूजय दूताना दिली. अनेक महामार्गावर होणाऱ्या घटना पाहता पोलीस प्रशासनाने मृत्यूजय दूतांची नेमणूक केली असून, त्यांना डी.जी. ऑफिसच्या आदेशानुसार महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी अंतर्गत दुधनी या गावातील मृत्यूजय दूताना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी दुधनीतील अनेक नागरिक उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!