दुधनीतील नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी,शांभवी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली म्हेत्रे यांची मागणी
अक्कलकोट,दि.८ : दुधनी (ता.अक्कलकोट) येथे बुधवारी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने प्रचंड नुकसान झाले.या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शासनाकडून बाधितांना मदत मिळावी यासाठी शांभवी फाऊंडेशनच्या संस्थापिका वैशाली शंकर म्हेत्रे यांनी मुख्याधिकारी आतिंश वाळुज आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे,तहसीलदार बाळासाहेब सिरसट,मुख्याधिकारी आतिश वाळूज,सुवर्णा पाटील, अंजली म्हेत्रे,शबाना मोमीन, राजश्री माळगे,ललीता गद्दी,रामा गद्दी, शरणगौड पाटील आदींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.त्यानंतर प्रांताधिकारी,तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी नुकसानग्रस्तांना शांभवी फाऊंडेशनच्या माध्यमातुन जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.युध्दपातळीवर नुकसानग्रस्तांना फाऊंडेशनच्या माध्यमातुन मदत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नुकसानग्रस्तांना
तातडीची मदत मिळावी
दुधनी व परिसरात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.बाधितांना जेवण व मदतकार्य सुरू आहे.याशिवाय त्यांना शासनाकडून थेट मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
वैशाली शंकर म्हेत्रे,संस्थापिका शांभवी फाऊंडेशन