स्वामींच्या प्रचितीमुळेच भाविकांमध्ये भक्तीचा महिमा वाढला
उपमुख्यमंत्र्यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
हल्ली देशभरात स्वामी भक्तीची परंपरा ही सर्व स्तरावरून प्रचलित होत आहे.स्वामींनी प्रत्यक्षात देत असलेल्या प्रचितीमुळेच ही परंपरा पुढेही अशीच चालू राहणार आहे, असे भावोदगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोट येथे बोलताना काढले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी अक्कलकोट दौऱ्यावर आले होते.त्यावेळी त्यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आवर्जून भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले.याप्रसंगी मंदिर समितीच्यावतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी फडणवीसांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देवून सत्कार केला.
याप्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक निस्सीम स्वामीभक्त या नात्याने ज्या ज्या वेळी अक्कलकोटला येण्याची संधी लाभते. त्यावेळी स्वामींचे दर्शन होईल या स्वामी भक्तीच्या वैचारिक आनंदाने मन गहिवरून येत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी खास मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेली विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केले.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, सुभाष देशमुख,माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,राम सातपुते, समाधान अवताडे,तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, राजकुमार झिंगाडे, मंदार पुजारी, व्यंकटेश पुजारी, प्रा.शिवशरण अचलेर, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, रवी मलवे, सागर गोंडाळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.