सोलापूर : वृत्तसंस्था
दारूच्या नशेत आईला शिवीगाळ करणाऱ्या लखन रघुनाथ गायकवाड (वय २३, रा. तोडकरवस्ती, बाळे-पुणे रोड, सोलापूर) याचा खून झाला आहे. आईच्या डोळ्यासमोर संशयित आरोपीने मुलाला बेदम मारहाण केली. यात मुलाचा मृत्यू झाला, अशी फिर्याद लखन गायकवाड याची आई अलका गायकवाड (वय-५५, रा.तोडकर वस्ती, बाळे-पुणे रोड, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार नागेश ज्ञानेश्वर कोळेकर (रा. तोडकर वस्ती, बाळे), आशुतोष ऊर्फ आवी राजू गाडेकर (रा. मेंगाणे नगर, बाळे, सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, लखन गायकवाड यास दारूचे व्यसन होते. नागेश कोळेकर यांच्या गाडीवर तो क्लीनर म्हणून काम करत होता घटनेच्या दिवशी म्हणजे १६ म २०२४ रोजी दुपारच्या सुमारास दारुच्या नशेत घरी येऊन आईल दारू पिण्यासाठी पैसे दे अस म्हणत होता. तेव्ह आईने माझ्याकडे पैस नाहीत असे सांगत असताना त्याने आईल शिवीगाळ करीत होता त्यावेळी नागेश कोळेक- आणि आशुतोष गाडेक तिथे आले. लखन यास आईस शिवीगाळ का करत आहे? तुला सांगितलेले कळत नाही काय? असे म्हणत लाकर्ड दांडका व प्लॅस्टिकच्या पाईपने मारहाण केली. तेव्हा, लखनच्य आईने मारहाण करू नका अस सांगत असताना त्या दोघांन त्यांचे काही ऐकले नाही. य बेदम मारहाणीतच लखन यास जखमी करून जीवे ठार मारल आहे. असे आईने फिर्यादीत म्हटल् आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बारावकर तपास करीत आहेत.