नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील राजधानी असलेल्या दिल्ली-एनसीआरमध्ये आज दि.१७ सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सुमारे अडीच तासांनंतर बिहारमध्येही बिहारमध्ये ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर एकच घबराट पसरली. लोक घराबाहेर पडले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र बिहारच्या सिवान जिल्ह्यात होते.
आज सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे ५.३६ वाजता भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसाररिश्टर स्केलवर याची तीव्रता ४.० इतकी होती. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लोकांना संयम राखावा, सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आणि संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
७ जानेवारी २०२५ रोजी बिहारमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोनदा भूकंपाचे धक्के तीनदा जाणवले होते. पटनासह अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांना हा भूकंप जास्त जाणवला. भूकंपाचे केंद्र तिबेटच्या झिझांग भागात जमिनीपासून सुमारे १० किमी खाली होते.