ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गावाची सुरक्षा मजबूत ; पोलीस अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते चपळगाव येथे सीसीटीव्हीचे लोकार्पण

अक्कलकोट, दि.२२ : गावच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे असून प्रत्येक गावाने याचे अनुकरण करत आपले गाव सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले. गुरुवारी अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे ग्राम सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत व बालाजी अमाईन्सचे उद्योगपती राम रेड्डी यांच्या सहकार्याने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण सातपुते यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

प्रारंभी चपळगाव प्रशालेच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.यानंतर पोलीस अधीक्षक सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. गरजू व गुणवंतांना आयोजक तम्मा गजधाने यांच्या शिवम्मा प्रतिष्ठानच्यावतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अंगणवाडी व आरोग्य सेविका यांचाही सन्मान करण्यात आला. एलआयसीचे प्रतिनिधी सुरेश सुरवसे यांच्या माध्यमातून चपळगावाला एक लाख रुपयाचे बीमा ग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सपत्नीक येथे सन्मान करण्यात आला. तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

चपळगाव येथे एकूण आठ कॅमेरे बसवण्यात आले आहेत या ठिकाणी ध्वनिक्षेपक यंत्रणा देखील कार्यान्वित झाली आहे त्या माध्यमातून प्रत्येक हालचाली दिसून येणार आहेत, असे सरपंच उमेश पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना
सांगितले. यावेळी सातपुते यांच्या ऑपरेशन परिवर्तन मोहीमेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीनेही सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना सातपुते यांनी चपळगावच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायत,पदाधिकारी,पोलीस प्रशासन व ग्रामस्थ या सर्वांचे चांगल्या सहकार्याबद्दल कौतुक केले. एलआयसी संबंधी बचत, गुंतवणूक, विमा संरक्षण व शालेय विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाबद्दल प्रबोधन, गावकऱ्यांच्या आचार,विचार व संस्कृतीतून गावाची सर्वांगीण प्रगती याविषयी आपल्या मनोगतातून त्यांनी गावकऱ्यांना प्रोत्साहन दिले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी राजेंद्र गौर, सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंतराव कुलकर्णी, दक्षिणचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, एलआयसी सोलापूर ९५R शाखाधिकारी भाऊसाहेब लबडे, उपशाखाधिकारी गणेश टेकाळे, विकासाधिकारी योगेश धर्माधिकारी आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे, बसवराज बाणेगाव, सिद्धाराम भंडारकवठे, संजय बाणेगाव, महादेव वाले, श्रावण गजधाने, विनोद गजधाने, अमोल गजधाने, निलेश गजधाने, लखन गजधाने, भागवत गजधाने, खाजपा गजधाने, कमलाकर जैनजांगडे, राजू गजधाने, जयभीम गजधाने, परमेश्वर वाले, प्रदीप वाले, मल्लिनाथ सोनार, महिबूब तांबोळी, शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानचे मनोज इंगुले, विशालराज नन्ना, अविनाश कदम, प्रकाश सुरवसे, शिवानंद उटगे,कुमार दुलंगे, रमेश शिंदे, गुलाब बाणेगाव, तंटामुक्त उपाध्यक्ष सायबण्णा म्हमाणे, प्राचार्य शिवबाळ मुली, पोलीस पाटील चिदानंद हिरेमठ व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले तर आभार बाणेगाव यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!