ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्याजवळ रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा, वाचा सविस्तर बातमी …

मुंबई :पुण्यातील रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विट करून दिली आहे.

पुण्यात होणाऱ्या या प्रकल्पात जवळपास दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, तर पाच हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेण्यात येत आहेत, यावरून सध्या राज्यात राजकारण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात मजबूत इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इको सिस्टम तयार होईल. त्यामुळे औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पीव्ही उत्पादन, ई-मोबिलिटी उत्पादनाचे प्रकल्प राज्यात येणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेण्यात येत आहेत, यावरून सध्या राज्यात राजकारण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!