---Advertisement---

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित एकता दौडला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर दि.३१ :- एक संघ भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती केंद्र शासनाच्यावतीने “एकतेचा उत्सव” म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन, सोलापूर, जिल्हा क्रिडा अधिकारी, नेहरू युवा केंद्र संघटन आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने आज सकाळी ७:०० वाजता हुतात्मा चौक ते शासकीय विश्रामगृह सात रस्ता अशा जिल्हास्तरीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. एकता दौडला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

एकता दौडला पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितिन तारळकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!