अक्कलकोटमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची स्थापना ; जयंती कार्यक्रमात मुंडे यांच्या आठवणींना उजाळा
अक्कलकोट, दि.१३ : येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान अक्कलकोटच्यावतीने मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानची स्थापना करून दरवर्षी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंडे यांचा अक्कलकोट जवळचा संपर्क होता त्यांचे कार्य जिवंत रहावे यासाठी या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. हा कार्यक्रम नवीन राजवाड्यासमोर तानवडे शॉपिंग सेंटर अक्कलकोट येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी पक्ष नेते आनंद तानवडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालापुरचे सरपंच शेकप्पा कलकुटगे होते.
प्रारंभी मुंडे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानवडे यांनी केले. यावेळी मुंडे यांच्या आठवणींना व त्यांच्या जीवन कार्याविषयी उजाळा दिला. त्यानंतर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. परमेश्वर आरबळे यांनी मनोगत व्यक्त केले. मुंडे यांनी विचारांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आणि वारसा दिलेला आहे तो पुढे चालवण्याचे काम आपण करूया असे बोलून त्यांच्या कार्याच्या आठवणी जाग्या केल्या.
याप्रसंगी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान शाखा अक्कलकोटच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. परमेश्वर आरबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मनोज जाधव (फुटाणे ), बादोला ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कत्ते, सांगवी खुर्द (कोळीबेट ) ग्रामपंचायत सदस्य मल्लिकार्जुन पारशेट्टी, शिरवळचे राजकुमार पाताळे, मीडिया प्रमुख मशाक मुल्ला, मायक्रोस्टार कंप्युटरचे संचालक इब्राहिम कारंजे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ धस यांनी केले.