ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिल्ली आंदोलनः आंदोनकर्त्याकडून पोलीसांवर तलवारीचा हल्ला

नवी दिल्ली : गेल्या तीन महिन्यांपासून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलनातील एका गटाने लाल किल्ल्यावर धुडगुस घालत धार्मिक ध्वज फडकविले होते. दरम्यान मंगळवारी 16 रोजी रात्री दिल्लीच्या सिंघु सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी एका आंदोलनकर्त्याकडून एका दिल्ली पोलीस अधिकार्‍यावर प्राणघातक हल्ला केला. हरप्रीत सिंह असे हल्ला करणार्‍या आंदोलनकर्त्याचे नाव असून त्याला आरोपीला अटक केली आहे.

हरप्रीत सिंह या आंदोलनकर्त्यानं तलवारीच्या बळावर दिल्ली पोलिसांकडून अगोदर गाडी आपल्या ताब्यात घेतली. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केल्यानंतर आरोपीनं मुकरबा चौकात गाडी सोडून देत एक स्कूटी घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान पोलीस स्टेशन हाऊस अधिकारी (डकज) समयपूर बादली आशिष दुबे आपल्या इतर सहकार्‍यांसोबत आरोपीचा पाठलाग करत होते. पोलिसांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीनं आशिष दुबे यांच्यावर तलवारीनं हल्ला केला. या हल्ल्यात दुबे थोडक्यात बचावले आहेत. परंतु त्यांच्या हातावर आणि गळ्यावर गंभीर दुखापत झालीय. हल्ल्यानंतर ताबडतोब आशिष दुबे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!