---Advertisement---

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: पोलिसांनी ‘त्या’ दोघांना घेतले ताब्यात

On: February 17, 2021 12:55 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे: बीड जिल्ह्यातील परळी येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्येमागे विदर्भातील शिवसेना नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. पूजा चव्हाणच्या मित्राशी झालेल्या संभाषणाचे ऑडीयो क्लिप व्हायरल झाले आहे. मंत्री संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर ११ दिवसांनी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही कोण आहेत? हे समोर आलेले नसल्याने सस्पेन्स पुन्हा वाढला आहे. वानवडी पोलिसांनी आज बुधवारी १७ रोजी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येणार आहे.

विरोधी पक्षाने मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने राजकारण तापले आहे. काल मंत्री राठोड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा देखील सुरु होती, मात्र शिवसेना पक्ष श्रेष्ठींकडून राजीनामा मंजूर करण्यात आला किंवा नाही याबाबत खुलासा झालेला नसल्याने राजीनाम्याबाबत गोपनीयता आहे.

पूजा चव्हाण सोबत पुण्यात भाऊ विलास चव्हाण आणि मित्र अरुण राठोड राहत होता. पूजा चव्हाणचा गॅलरीतून पडून मृत्यू झाला. त्यावेळी विलास आणि अरुण सोबत होते. त्यांनीच पूजा चव्हाणला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते.

या प्रकरणात ज्या ज्या व्यक्तींवर संशय आहे, त्यांना पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. त्यामुळे आज ताब्यात घेतलेले दोन जण कोण? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!