नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील ग्रामीण भागापासून ते शहरीभागाचे अनेक लोकांची विश्वासार्ह आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून एलआयसीकडे बघितले जाते. यामुळेच LIC च्या अनेक योजना देशभरात खूप लोकप्रिय आहेत. एलआयसी विविध उत्पन्न गटांचा विचार करून अनेक योजना चालवत आहे. यातच आज आम्ही तुम्हाला LIC च्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत.
एलआयसीच्या या योजनेचे नाव जीवन प्रगती योजना आहे. या योजनेत तुम्ही फक्त 200 रुपयांची बचत करून 28 लाख रुपयांचा लाभ मिळवू शकता. ही एक नॉन-लिंक्ड लाभ योजना आहे. जी तुम्हाला संरक्षण आणि बचत दोन्ही देते. या योजनेत गुंतवणूकदारांचे रिस्क कव्हर दर पाच वर्षांनी वाढते. अशातच तुम्ही 200 रुपयांची बचत करून 28 लाख रुपये कसे मिळू शकता, हे समजून घेऊ…
एलआयसी जीवन प्रगती योजनेत नोंदणी केल्यानंतर तुम्हाला दररोज 200 रुपये वाचवावे लागेल. अशातच तुम्हाला एका महिन्यात सुमारे 6 हजार रुपये या योजनेत गुंतवावे लागतील. अशा पद्धतीने तुमचे वार्षिक 72 हजार रुपये जमा होतील. तुम्हाला एलआयसीच्या जीवन प्रगती योजनेत वार्षिक आधारावर 72 हजार रुपये गुंतवावे लागतील. या योजनेत 20 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 28 लाख रुपये मिळतील. याशिवाय तुम्हाला रिस्क कव्हरचाही लाभ मिळेल. दरम्यान, देशातील अनेक लोक एलआयसीच्या जीवन प्रगती योजनेत गुंतवणूक करत आहेत. यातच जर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगली योजना शोधत असाल तर जीवन प्रगती योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.