ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बस व कंटेनरमध्ये भीषण अपघात : १८ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बेहता मुजावर पोलीस स्टेशन परिसरात डबल डेकर बस आणि दुधाच्या कंटेनरमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात बसमधील 18 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर सुमारे 20 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये 14 महिला, 3 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. ही बस बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जात होती, असे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बेहता मुजावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या दुधाच्या टँकरला पहाटे 05:15 च्या सुमारास धडकल्याने 18 जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना बाहेर काढून सीएचसी बांगरमाऊ येथे उपचारासाठी दाखल केले. बेहता मुजावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती देताना उन्नावचे डीएम गौरांग राठी म्हणाले, “आज पहाटे 05.15 च्या सुमारास मोतिहारी, बिहार येथून येणारी खासगी बस दुधाच्या टँकरला धडकली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 19 जण जखमी झाले आहेत.” प्राथमिक तपासात बसचा वेग खूप जास्त होता असे दिसते आणि जखमींवर उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव जिल्ह्यातील रस्ता अपघाताची दखल घेतली आहे आणि मृतांच्या शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!