ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फत्तेसिंह संस्थेच्या व्यापारी गाळ्यांना लोकनेते स्व.आ.बी.टी माने यांचे नाव 

संस्था अध्यक्ष राजीव माने यांच्याकडून ५ लाखांची देणगी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या व्यापारी गाळ्यांना लोकनेते स्वर्गीय आमदार बी.टी माने व्यापारी संकुल असे नाव देण्यात आले आहे.या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष राजीव माने यांनी संस्थेला ५ लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली. संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा डॉ. मनोहर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

त्यावेळी वार्षिक सर्व साधारण सभेत संस्थेच्या विविध विषयावर आणि संस्थेच्या भविष्यातील वाटचालीवर संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त, सल्लागार मंडळातील सदस्य आणि संस्थेच्या सर्व सभासदामध्ये विस्तृतपणे चर्चा केली.स्व.माजी आमदार बी.टी. माने यांचे संस्थेच्या उभारणीकरिता आणि प्रगतीकरिता मोलाचे योगदान आहे,असे मत अनेक जेष्ठ सभासदांनी मांडले.मार्केट यार्ड जवळच्या तारामाता प्रशालेच्या दर्शनी मोकळ्या जागेवर संस्थेच्या आर्थिक प्रगतीकरिता एकूण सोळा गाळे बांधण्यात आले आहेत. या माध्यमातून संस्थेला आता भाड्याच्या रूपाने आर्थिक लाभ होणार असल्याचे मत माने यांनी यावेळी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी संस्थेच्या संचालकांनी या व्यापारी संकुलाला लोकनेते स्व.बी.टी.माने व्यापारी संकुल असे नाव देण्यात यावे असे सूचित केले होते.सर्व संचालकांची इच्छा
पाहून माने यांनी ५ लाख रुपायाचा धनादेश सल्लागार मंडळातील सदस्य ऍड. शरदराव फुटाणे, स्वामीराव पाटील, माजी अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, सुरेशराव सूर्यवंशी, विलास गव्हाणे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव, संस्थेचे विश्वस्त तानाजी चव्हाण, सुधाकर गोंडाळ, अमर शिंदे आणि संस्थेचे संचालक व कार्यकारी अधिकारी संतोष जाधव-फुटाणे यांच्या हस्ते संस्थेला देण्यात आली.यावेळी दत्तात्रय पाटील, भिमराव साठे, अरुण जाधव, प्रकाश पडवळकर, अरविंद साळुंके, रविंद्र कदम, लक्ष्मण पाटील, सोपान गोंडाळ, मोहन मोरे, विठ्ठल मोरे, दिलीप काजळे आदी उपस्थित होते.सभेची
सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले.संस्थेच्या  मयत सदस्य यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर सर्व सभासदांचे स्वागत आणि अहवाल वाचन संस्थेचे विश्वस्त
चव्हाण यांनी केले.जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

 

विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रोत्साहन पर बक्षीस देणार

संस्थेला देण्यात आलेली रक्कम ही डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे आणि  या रकमेच्या व्याजातून दरवर्षी फत्तेसिंह शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या शाळांमधील इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून देण्यात येईल. हा उपक्रम निरंतर चालू राहावा यासाठी  प्रयत्न करणार आहोत.

राजीव माने,अध्यक्ष फत्तेसिंह संस्था

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!