फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत कै.सर्जेराव जाधव विकास पॅनलचे वर्चस्व; ७ पैकी ७ जागांवर वर्चस्व
अक्कलकोट, दि.६ : फत्तेसिंह शिक्षण
संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कै. सर्जेराव जाधव श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था विकास पॅनलने सात पैकी सात जागा जिंकून वर्चस्व प्राप्त केले.यात प्रगती विकास पॅनलचा
पराभव झाला.या संस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यापैकी प्रकाश पडवळकर यांनी कै. सर्जेराव जाधव यांच्या पॅनलला पाठिंबा दिला होता.आज झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत ९० पैकी ८० जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यासाठी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत मतदान पार पडले होते. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. यात दोन मते बाद होऊन ७८ मतांची मोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.यामध्ये जाधव
पॅनेल तर्फे माजी आमदार बीटी माने यांचे सुपुत्र
राजेंद्र माने हे ५६, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे ४७, तानाजी चव्हाण ४८, संतोष फुटाणे (जाधव ) ४९,प्रल्हाद जाधव ४१, सुधाकर गोंडाळ ४७,अमर शिंदे ३८ मते घेऊन विजयी झाले.प्रगती विकास पॅनल पॅनलतर्फे माजी अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर,उपाध्यक्ष सुभाष गडसिंग,संचालक विलास गव्हाणे, महादेव माने, दिलीप काजळे, मिलिंद साळुंखे, अरुण जाधव हे उभे होते. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.या निवडणुकीत मिळालेला विजय हा कै.आमदार बी.टी माने, कै.सर्जेराव जाधव,कै.उद्धवराव जंगले यांना समर्पित असून ही आमच्यासाठी सत्ता नसून ती सेवेची संधी आहे,अशी प्रतिक्रिया नियोजित अध्यक्ष राजेंद्र माने यांनी दिली आहे. सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास
पात्र ठरवून संस्थेच्या वाटचालीत आम्ही भरभरून योगदान देणार असल्याचे नूतन संचालक बाळासाहेब मोरे यांनी सांगितले.जाधव पॅनलच्या विजयासाठी जेष्ठ विधिज्ञ
शरद फुटाणे,सुरेशचंद्र सूर्यवंशी,डॉ. मनोहर
मोरे,सोपानराव गोंडाळ,मोहन चव्हाण आदींनी प्रयत्न केले. निवडणूक निर्णय अधिकारी खाजाबाई हलले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन शिंदे तर मदतनिस म्ह्णून माणिक बिराजदार यांनी काम पाहिले.