ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अंजिराचे आहे आरोग्याला अनेक लाभ

अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये आढळतो. उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतूत अंजीराचा सिझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर चवीला गोड असते.

अंजीरचे फायदे
अंंजिरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए, बी, सी बर्‍याच प्रमाणात मिळते. तसेच त्याच्यापासून शर्करा भरपूर प्रमाणात मिळते.
अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅसेसचें तक्रार दूर होतात.
पित्त विकार, रक्तविकार व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.
अपचन, अ‍ॅसिडिटी, गॅसेसचा त्रास होणार्‍या व्यक्तींनी दररोज सकाळ, संध्याकाळ 1 ते 2 अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा वरील त्रासापासून आराम मिळेल.
अंजीर खाल्ल्यामुळे बौद्धिक व शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमीतपणे खावीत यामुळे मूत्रविकार दूर होतात.
अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्ल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत.
दररोज कोणतेही एक फळ खाल्ल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते. अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. अंजीर शक्तिवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन पाणी प्यावे थोड्याच दिवसांत अजीर्णाची तक्रार दूर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!