पुणे,दि.२ : पुणे शहरातील वाढत्या कोरणा पार्श्वभूमीवर पुढील सात दिवसासाठी अंशत; लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील. मात्र होम डिलीव्हरी सुरू राहील.
पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत पुण्यात तील मिनी लॉकडाउनची माहिती दिली.
सौरभ राव म्हणाले कि, लॉकडाउन कुणालाच नको आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्या पाहता काही निर्बंध लावावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुढील काही दिवसासाठी काही नियम केले गेले आहेत. नव्या नियमानुसार सार्वजनिक बससेवा, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, बीयर-बार, चित्रपट गृहे, मॉल्स हे पुढील ७ साठी बंद राहणार आहेत. उद्यापासून पुढील सात दिवसासाठी हे नियम लागू राहतील.
संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. बंद काळात होम डिलीव्हरी सुरू राहणार आहे. सोबतच पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएलची बससेवा पुढील ७ दिवसांसाठी बंद असणार आहे.
पुणे शहरात लग्न आणि अंत्यविधी वगळता सारे धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहेत. पुण्यात ३० एप्रिल पर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रक अनुसार होणार असल्याची माहिती सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.