नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेतील राज्य कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये अग्नितांडव सुरु आहे. या अग्नितांडवाने सुपरपॉवर अमेरिकेला अक्षरक्ष: हादरवून सोडलय. महाप्रचंड नुकसान झालय. रस्त्यावर रात्र काढण्यासाठी लोक मजबूर झाले आहेत. हजारो घरं आगीत जळून खाक झाली आहेत. लोकांना रस्त्यावर व मदत शिबीरांचा आधारा घ्यावा लागतोय. या आगीमुळे आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या चार दिवसांपासून लागलेली ही आग 40 हजार एकरमध्ये पसरली आहे. यात 29 हजार एकरचा परिसर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलापासून ते घरापर्यंत बरच काही या आगीत जळून खाक झालय. पाण्याची फवारणी हाच या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा एकमेव मार्ग निवडण्यात आला आहे. कॅलिफोर्नियातील अनेक बँका या आगीत जळून खाक झाल्या आहेत.
हॉलिवूड हिल्समध्ये राहणाऱ्या अनेक हॉलिवूड कलाकारांना नाईलाजाने आपलं घर सोडावं लागलं आहे. त्याशिवाय अनेक कलाकारांची कोट्यवधींची घर जळून खाक झाली आहेत. सेंटा एना हवेचा वेग जितका वाढतोय, तितकीच दिशा सुद्धा बदलतेय. लॉस एंजेलिसचा सनसेट बुलेवार्डला आगीच्या ज्वाळांनी घेरलय. आगीने इतकं विक्राळ रुप धारण करण्याला हवा कारणीभूत आहे. कॅलिफोर्नियाच्या या आगीत पॅरिस हिल्टन, टॉम हँक्स, स्टीवन स्पिलबर्गसारख्या हॉलिवूड सेलिब्रिटीज घर जळून खाक झालय. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचं घर रिकाम करण्यात आलय. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडने यांचे सुपूत्र हंटर बायडेन यांचं आलिशान घर आगीत जळून खाक झालय. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इटलीचा दौरा रद्द केलाय.