ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी उद्योजक विलास कोरे यांच्याकडून पाच लाखांची देणगी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शहराचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या नूतन जीर्णोद्धारासाठी लोक वर्गणी जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शुक्रवारी उद्योजक विलास कोरे यांनी पाच लाख रुपयांची देणगी या कामासाठी दिली आहे.
हा धनादेश मंदिर ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. श्री मल्लिकार्जुन मंदिर हे अक्कलकोट शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. म्हणून लवकरात लवकर हे पूर्ण व्हावे ही माझ्यासह अनेक भाविकांची इच्छा आहे. त्यामुळे मदत करण्याचा निर्णय घेतला, असे कोरे यांनी याप्रसंगी बोलताना
सांगितले.श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या सभामंडपासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून चार कोटी रुपयांचा निधी यापूर्वी मंजूर झाला आहे.या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणखी दोन कोटी रुपयांची गरज आहे.हा निधी लोक वर्गणीतून जमा करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टच्यावतीने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे विश्वस्त आणि भाविकांमार्फत वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू आहे.या कामासाठी लोकसभागातून २ कोटी उभा करायचे आहेत.आतापर्यंत २० लाखांपेक्षा अधिक वर्गणी जमा झाली आहे. प्रत्येक विश्वस्तांनी प्रत्येकी १ लाख रुपये
दिले आहेत,असे श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी यांनी सांगितले .

या धार्मिक कार्याला अक्कलकोट शहर व तालुक्यातील भाविकांनी हातभार लावावा आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन विश्वस्त महेश हिंडोळे यांनी केले.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे,स्वामीनाथ हिप्परगी, बसवराज माशाळे,बसलिंगप्पा
खेडगी,राजू हिप्परगी, दिनेश पटेल, गजानन पाटील,राजशेखर नागुरे,प्रशांत लोकापुरे ,गौरीशंकर बहिरगोंडे,ओंकार कोरे,विजयकुमार कापसे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!