अक्कलकोट,दि.१ : जेऊर अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या माध्यमातून गावची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी व्यक्त केला. बुधवारी तहसीलदार सिरसट यांच्या हस्ते या कॅमेराचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील हे होते.
प्रारंभी प्रतिमा पूजन करून फित कापून या सिसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक महेश स्वामी, प्रशिकक्षणार्थी तहसीलदार कांबळे, नागनाथ सुरवसे, उपसरपंच काशीराया पाटील, शिवाजी कलमदाणे, अंबाराया कनोजी, काशिनाथ कडगंची, रमाकांत भासगी, सचिन चव्हाण, शिवानिंगप्पा पत्रिगीडा, सुरेश सोनार, सुरेश कोळी आदींची उपस्थिती होती.
या कॅमेऱ्यांमुळे जेऊर येथील काशिलिंग मंदिर परिसर, मेन रोड, स्टेशन रोड, सोलापूर रोड, ग्रामपंचायत परिसर, बसस्थानक हा परिसर सीसीटीव्ही कक्षेत येणार आहेत. आणखी २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन सुरू आहे.मल्लिकार्जुन पाटील म्हणाले,गावात सिसिटीव्ही बसविल्याने प्रशासनावर असलेला गाव सुरक्षेचा ताण कमी होणार असून गुन्हेगारी कमी होऊन वातावरण चांगले होण्यास मदत होणार आहे.
पोलीस निरीक्षक स्वामी म्हणाले, पूर्वी गावातील बुजुर्ग लोक सीसीटीव्हीसारखेच काम करून गावात सलोखा ठेवायचे, पण आता नवी पिढी आली आणि त्यासोबतच गुन्हेगारी स्वरूप देखील बदलले त्यासाठी सिसीटीव्ही यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. यावेळी पाटील यांनी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी इरणा कणमुसे, नागनाथ तळवार, सिद्धाराम कापसे, इरप्पा कोळी, रेहमान अत्तार, भीमाशंकर वग्गे, सुनील जाधव, उमाकांत राठोड, काशिनाथ कळवंत, प्रकाश ननवरे, गंगाधर इरशेट्टी यांच्यासह ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन शंकर अजगोंडा यांनी केले तर आभार तुकाराम दुपारगुडे यांनी मानले.