ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बीसीसीआयच्या अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविराेध निवड

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी जय शहा तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविराेध निवड झाली आहे.
पदाधिकारी निवडीसाठी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईतील ताज हॉटेलमध्‍ये बैठक झाली. यावेळी ध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी जय शहा तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविराेध निवड झाली. तर संयुक्‍त सचिवपदी देवाजीत सैकिया तर आयपीएल चेअरमनपदी अरुण धूमल यांची निवड झाली आहे.

दि. ११ आणि १२ ऑक्‍टोबर रोजी ‘बीसीसीआय’ पदाधिकारी निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाले. १३ ऑक्‍टोबर अर्जांची छाननी झाली. आज मुंबईतील ताज हाॅटेलमध्‍ये निवडणूक पार पडली. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत राज्य संघटनांच्या प्रतिनिधींची यादी आली होती. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्या जागी रॉजर बिन्नी यांचे नाव दिले होते.

रॉजर बिन्नी कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. सौरव गांगुली यांनी २३ ऑक्‍टोबर २०१९ रोजी बीसीसीआय अध्‍यक्षपदाची धुरा संभाळली होती. तर २४ ऑक्‍टोबर २०१९ रोजी जय शाह यांनी सचिवपदाची सूत्रे स्‍वीकारली होती. दोघांचाही कार्यकाळ ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये संपणार होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!