मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमधील नेत्याची आता आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच महाविकास आघाडीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक आवाहन दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर 3 वर्षापुर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने शासनाकडे सादर केलेला चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा असे ते म्हणालेत. तसेच मला क्लीन चिट देण्यात आल्याने फडणवीसांनी तो अहवाल लपवला असा आरोपही त्यांनी केला आहे. ते आज प्रसार माध्यमांशी बोलत होते.
अनिल देशमुख म्हणाले, 3 वर्षांपूर्वी परमबीर सिंग व सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमुर्ती चांदीवाल यांनी ११ महीने चौकशी केली. या चौकशीदरम्यान दहशतवादी व दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे यांनी उलट चौकशीत कोर्टामध्ये स्पष्ट पणे सांगीतले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएने मला पैसे मागीतले नाहीत आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाहीत. दहशवाद आणि 2 खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबड्यावर राजकीय सुडबुध्दीने देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली”, असा हल्ला अनिल देशमुखांनी केला आहे.
पुढे अनिल देशमुख म्हणाले, दहशवादी व दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे हा देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर जुनाच 3 वर्षांपूर्वीचा आरोप केला आहे. काल सांगीतल्याप्रमाणे मला जामीन देताना उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगीतले की, सचिन वाझे हा 2 खुनाच्या गुन्हाच्या आरोपात असल्यामुळे व तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर 3 वर्षापुर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने शासना सादर केलेला चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा”, असे आवाहनही अनिल देशमुख यांनी केले.