अक्कलकोट : प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कन्या चि.सौ.का.स्नेहल आणि बसवराज पाटील यांचे चिरंजीव मंजूनाथ (रा.गुलबर्गा) यांच्या विवाह सोहळ्याचा शाही स्वागत समारंभ बुधवारी सोलापूर येथे पार पडला.प्रारंभी सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी विविध मठाधिपती आणि प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत अक्षता सोहळा पार पडला होता.
त्यानंतर याचा विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ कर्मयोगी अप्पासाहेब काडादी फंक्शन हॉल सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापुर येथे आयोजित केला होता.यावेळी आलेल्या सर्व मुख अतिथी व मान्यवरांचे स्वागत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, युवा नेते शिवराज म्हेत्रे,शीतल म्हेत्रे,प्रथमेश म्हेत्रे,लक्ष्मी म्हेत्रे,डॉ.उदय म्हेत्रे,मल्लिनाथ म्हेत्रे, अशपाक बळोरगी,मल्लिकार्जुन पाटील,सिद्धार्थ गायकवाड,बाबासाहेब पाटील,रईस टिनवाला हे करत होते.या सोहळ्याला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,काशी पिठाचे जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी,खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी,तुमकुर मठाचे ष. ब्र.१०८ गंगाधर शिवाचार्य महास्वामीजी,जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे,आमदार प्रणिती शिंदे,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी,आमदार राजेंद्र राऊत,माजी मंत्री मधुकर चव्हाण,बसवराज पाटील,माजी आमदार दिलीप माने,शिवशरण पाटील, राजन पाटील,धनाजी साठे,गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे,रोहन परिचारक,बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ,शिवसेनेचे धाराशिव जिल्हा सह संपर्क प्रमुख शंकर बोरकर,व्ही.पी शुगरचे व्ही.पी पाटील आदी प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून वधुवरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला. याशिवाय वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख अमोलराजे भोसले,महेश इंगळे,मनोहर सपाटे,प्रकाश वाले, संजय हेमगड्डी,श्रीशैल नरोळे,बाळासाहेब शेळके,विनोद भोसले,मिलन कल्याणशेट्टी,सुदीप चाकोते,चेतन नरोटे,महेश गादेकर, सुरेश हसापुरे,महेश हिंडोळे,बाळासाहेब मोरे,मल्लिनाथ स्वामी,लाला राठोड,अभय खोबरे,बसवराज बाणेगाव,धनेश अचलारे,गणेश डोंगरे,अंबादास करगुळे,पंडित सातपुते, बसवराज म्हेत्रे, राज सलगर,गुरु म्हेत्रे,सातलींग शटगार,व्यंकट मोरे,विश्वनाथ भरमशेट्टी,शाहु सलगर,काशिनाथ कुंभार,मुबारक कोरबू,मोहन देडे आदींसह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर तसेच सोलापूर शहरातील विविध मान्यवर,विविध गावचे सरपंच,सोसायटीचे चेअरमन,काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा वीरशैव माळी संघटनेचे पदाधिकारी व सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी या विवाह सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.