अक्कलकोट, दि.१७ : गेल्या चार दिवसांपासून जुनी पेन्शन योजना चालू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनात सहभागी होत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. जुनी पेन्शन योजना सुरू करावी यासाठी शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि जुनी पेन्शन योजना चालू करावी यासाठी म्हेत्रे यांनी बेमुदत संपास आंदोलन स्थळी जाऊन पाठींबा दिला आहे.
काही झाले तरी जुनी पेन्शन योजना चालू झालीच पाहिजे. त्यावर तुमचा हक्क आहे. आणि ते तुम्हाला मिळालाच पाहिजे. त्यामुळे आमचा या आंदोलनाला पाठिंबा असेल आणि सरकारला आंदोलन करून निषेध करून जुनी पेन्शन योजना चालू करण्यास भाग पाडू, असे आश्वासन यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आंदोलनकर्त्याना दिले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे, विश्वनाथ भरमशेट्टी, प्रवीण शटगार, काशिनाथ कुंभार, नितीन ननवरे, सोमनाथ चिकलंडे, गुरव आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.