---Advertisement---

अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील रोहिणी न्यायालय परिसरात गोळीबार, गोळीबारात गॅंगस्टार जितेंद्र उर्फ गोगीची हत्या

Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील राजधानी अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या रोहिणी न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी कुख्यात गुन्हेगार जितेंद्र उर्फ गोगी याला न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी वकीलाच्या वेशामध्ये आलेल्या दोन जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनीही गोळीबार केला. यामध्ये दोन हल्लेखोरांसोबत गुन्हेगार गोगी याचाही मृत्यू झाला.

दिल्लीतील रोहिणी कोर्टात रूम नंबर 207 मध्ये आज दुपारी गोळीबार झाला. यात गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या टिल्लू गॅंगने जितेंद्र उर्फ गोगीची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान गोगीवर खून, खंडणी, पोलिसावर हल्ला यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. जितेंद्र उर्फ गोगीला मागीलवर्षी गुरुग्राम मधून अटक करण्यात आले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!