ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कचरा गोळ्या करणार्‍या ‘घंटा गाडी’च्या कर्मचार्‍यांनी परत केले सोन्याचे मंगळसुत्र

अक्कलकोट, दि.५: सध्याच्या युगात सर्वत्र प्रामीणकपणा लोप पावत चालल्याचे चित्र पाहयला मिळत आहे, याला छेद देण्याचे काम अक्कलकोट नगरपरिषदेच्या सकाळी कचरा गोळ्या करणार्‍या घंटा गाडीच्या कर्मचार्‍यांनी दिला आहे. शहरातील आझाद गल्लीतील प्रसिध्द हक्केचा हनुमान मंदिराचे पुजारी यांच्या पत्नीच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे सुमारे रू. 1 लाख 50 हजार किंमतीचे मंगळसुत्र परत केले आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

रविवारी सकाळी नगरपरिषदेची कचरा गोळा करणारी घंटागाडी रोजच्या प्रमाणे घरोघरी जाऊन कचरा घेत असताना आझाद गल्लीतील प्रसिध्द हक्केचा हनुमान मंदिराचे पुजारी यांची पत्नी सुनिता रमेश निलेगांवकर यांच्या गळ्यातील रू. 1 लाख 50 हजार किंमतीचे मंगळसुत्र नजरचुकीने कचर्‍या सोबत घंटागाडीत गेले असता ते हुडकण्याकामी घरातील सर्वच मंडळी कामाला लागले असताना सदरची माहिती सामाजिक कार्यकर्ते देविदास कवटगी, रवि बंकापुरे, व माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, गणेश कांदे यांना कळताच त्यांनी निलेगांवकर यांच्या घरापर्यंत जाऊन पार्श्वभूमी ऐकूण घेतली असता त्यांनी सकाळच्या दरम्यान आलेल्या नगरपरिषदेच्या कचरा गोळा करणार्‍या घंटागाडीचे कर्मचारी असलेले दशरथ मोरली (मुकादम), बालाजी पारखे, सुभाष सोनकांबळे, भीमा अंदोडगी, रवि अंदोडगी, गुरू अंदोडगी यांच्यासह अन्य घंटागाडी कर्मचारी चालक, सफाई कामगार आणि आरोग्य निरीक्षक नईम बागवान यांच्याशी संपर्क करून सदरील मंगळसुत्र हुडकण्याकामी मोहिम आखण्यात आली, या अथक शोध मोहिमेला यश आले. सदर परिश्रमक यांनी निलेगांवकरच्या घरापर्यंत जाऊन सदरचे मंगळसुत्र परत करण्यात आल्याने घंटा गाडीच्या कर्मचार्‍यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत नगरपरिषदेचे मुख्याअधिकारी सचिन पाटील यांनी सदरच्या कर्मचार्‍यांची भेट घेऊन कौतुक व अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!