मुलींनी अंतरीक बळावर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी ; कै.बाळासाहेब इंगळे तंत्रनिकेतनमध्ये महिला दिनानिमित्त कार्यक्रम
अक्कलकोट, दि.९ : शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील मुली सुशिक्षित होत आहेत. त्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची प्रेरणा घेऊन अनेक मुली विविध क्षेत्रात शिक्षण घेऊन देश व जगभरात विविध मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्याप्रमाणे महाविद्यालयातील मुलींनी प्रेरणा घ्यावी आणि उज्वल यश संपादन करावे, असे आवाहन वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त कै. इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.प्रारंभी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेस व कै.कल्याणराव इंगळे यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन महेश इंगळे यांनी स्वागत केले.
यावेळी महेश इंगळे व महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांना इंगळे यांनी केक भरवून जागतिक महिला दिनाचा आनंद द्विगुणीत केला. याप्रसंगी उपप्राचार्य विजय पवार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.