ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गोगांवच्या सरपंच सुरवसे यांनी आणला चार महिन्यात १ कोटी ९ लाखांचा निधी

अक्कलकोट  : गोगांव ( ता. अक्कलकोट येथील सरपंच वनिता सुरवसे यांनी पदभार घेऊन चार महिन्यात गावच्या विकासासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विभागांना पाठपुरावा करून  १ कोटी ९ लाख ४९ हजाराचा निधी मंजूर करून आणला आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर वसलेले गोगांव हे छोटेसे गाव आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकी एक सामाजिक कार्य करण्याची मनाशी गाठ घालून गोगांवच्या विकासासाठी निवडणूक लढवली.त्यात वनिता सुरवसे यांनी यश मिळवले. त्यानंतर चार महिन्यात गावच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्फ़त आमदार निधी- कल्लेश्वर मंदीर ५ लाख ज़िल्हा परिषद सेसनिधी – कल्लेश्वर मंदिर ५ लाख,१४ मैल ते खैराट ५ किमी रस्ता डांबरीकरण – ६५ लाख, डीपीडीसी मधुन् एमएसईबी साठी -४ लाख ९ हजार, जिल्हापरिषद आरोग्य विभाग – पाण्याची टाकी -७ लाख , जलसंधारण – नाला खोलीकरण -५ लाख, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील आमदार निधीतुन – ५ लाख, जिल्हा परिषद सोलापुर आनंद तानवडे आणि विजयराज डोंगरे यांच्याकडून १३ लाख ४० हजार व पंचायत समिती सदस्य गुंडप्पा पोमाजी यांच्या निधीतून नऊ बाकडे, मागासवर्गीय १५ टक्के निधीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावे या उद्देशाने लॅपटॉप, डिजिटल झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, वाटप करण्यात आले आहे. सर्वांना सोबत घेऊन यापुढे आपण गावाचा विकास साधणार असल्याचे सुरवसे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!