तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.४ : धोत्री (ता.द.सोलापूर) येथील गोकुळ शुगर्स इंडस्ट्रीज कारखान्याने उत्पादित केलेल्या साखर पोत्याचे पूजन नुकतेच करण्यात आले.या पार्श्वभूमीवर दिवाळी निमित्त ऊस उत्पादकांना २०
किलो साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात देण्यात देण्यात येत आहे.त्याचा प्रारंभ कुरनूर व बावकरवाडी येथून करण्यात आला आहे.कारखाना अंतर्गत सर्वच गट कार्यालया अंतर्गत शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली.गोकुळ शुगर्सच्या सातव्या
गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला.सध्या कारखान्याचे प्रतिदिन ३ हजार मेट्रिक टन गाळप सुरू असून उत्पादित साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर दत्ता शिंदे , संचालक मंडळ आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हंगाम पूर्ण क्षमतेने आणि सुरळीतपणे सुरू असल्याबद्दल चेअरमन दत्ता शिंदे यांनी शेतकऱ्यांना धन्यवाद दिले. ऊस गाळपाला पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५ दिवसाला बिलाची रक्कम जमा करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.यावेळी कारखान्याचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे , डायरेक्टर विशाल शिंदे , प्रगतिशील शेतकरी प्रदीप गायकवाड , कार्तिक पाटील ,जनरल मॅनेजर बाळासाहेब कुटे , मुख्य शेतकी अधिकारी अमरसिंह क्षीरसागर ,कुरनुरचे सरपंच व्यंकट मोरे,राजा चव्हाण वर्क्स मॅनेजर सिद्धेश्वर उमरदंड , प्रोडक्शन मॅनेजर प्रकाश दिगडे ,अभिजित गुंड यांच्यासह कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.