राजकारणात उतरण्याची वेळ आली तर पूर्ण ताकदीनिशी उतरू;वाढदिवसानिमित्त गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा सत्कार
अक्कलकोट, दि.१६ : शेतकरी हेच माझे दैवत आहेत आणि ते हितचिंतक सुद्धा आहेत. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या सत्काराने व शुभेच्छाने मी भारावलो आहे.त्यांच्यासाठी प्रसंगी राजकारणात उतरण्याची वेळ आली तर पूर्ण ताकदीनिशी उतरून जनतेची सेवा करू,अशी ग्वाही गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी
दिली.दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्यावर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.पुढे बोलताना
शिंदे म्हणाले की,आम्ही ज्या उद्देशाने कारखाना उभा केला आहे तो उद्देश सफल होत आहे.तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत तो नेऊन यशस्वी करून दाखवण्याचा
प्रयत्न केला आहे.त्याला शेतकऱ्यांचेही मोठे सहकार्य व पाठबळ लाभले आहे.भविष्यातही अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या सहकार्यामुळे भविष्यात निश्चितपणे चांगले काम आपल्याला बघायला मिळेल. यासाठी आपले बळ आणि आपले आशिर्वाद खूप मोलाचे आहेत,असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी कारखाना कार्यस्थळावर हनुमान मंदिराचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिंदे यांच्या पत्नी प्रीती शिंदे, युवराज शिंदे, विशाल शिंदे,जनरल मॅनेजर प्रदीप पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात १२४ जणांनी रक्तदान केले.यासाठी सोलापूर अक्षय ब्लड बँकचे सहकार्य लाभले.गोकुळ
शुगरच्या ९० कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.याला दक्षिण सोलापूर आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले.सकाळपासून दिवसभरात कारखाना कार्यस्थळावर दक्षिण सोलापूर,अक्कलकोट, मराठवाडा भागातील शेतकऱ्यांनी चेअरमन शिंदे यांच्या सत्कारासाठी मोठी गर्दी केली होती.यात फोनवरूनही मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला.यात खास करून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,माजी
गृहराज्यमंत्री सतेज पाटील,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,तुळजाभवानी कारखान्याचे सुनील चव्हाण,लोकमंगलचे सतीश देशमुख,महेश देशमुख,कंचेश्वरचे धनंजय भोसले,अश्पाक बळोरगी,क्रांती शुगरचे शरद लाड, शहाजी पवार,उमेश पाटील,नागराज पाटील,व्यंकट मोरे,राजू चव्हाण,सिद्धाराम भंडारकवठे,कार्तिक पाटील,अभिजित गुंड,उमेश पवार,महेश माने आदींनी शुभेच्छा दिल्या.तुळजापूर,मुस्ती,अक्कलकोट,संगदरी, धोत्री ,दर्गनहळळी,बोरेगाव,कुरनूर, किणी, चुंगी, दहिटणे मोट्याळ,नन्हेगाव,चपळगाव या भागातील ऊस उत्पादक शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे यांना भविष्यात
मोठ्या संधी
युवा नेते दत्ता शिंदे यांना कारखानदारी
क्षेत्रातला अनुभव मोठा आहे.या क्षेत्रामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यामुळे आज गोकुळ शुगर कारखाना नावलौकिकास पात्र झाला आहे.भविष्यात राजकारणात देखील त्यांना मोठ्या संधी आहेत.त्यादृष्टीने त्यांनी काम करावे.
सुनील चव्हाण, चेअरमन तुळजाभवानी कारखाना