अक्कलकोट, दि.२९ : गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि. धोत्री (ता. द. सोलापूर ) च्या ९ व्या गळीत हंगामाचा सन २०२३ – २४ चा मिल रोलर पुजन सोहळा कारखान्याचे उपाध्यक्ष विशाल शिंदे
व मॅनेजिंग डायरेक्टर कपील शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.या दोघांच्या हस्ते त्याचे पूजन करण्यात आले. २०२२-२३ चा हंगाम यशस्वी केल्यानंतर कारखान्याने आता पुढील हंगामाची तयारी सुरू केली आहे. कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम २०२३-२४
साठी प्रतिदिन ६ हजार मेट्रिक टन गाळप करून १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. गाळप उदिष्ट पूर्ण करण्यासाठी ४०० मोठया वाहनाचे व २०० मिनी कार्ट वाहनाचे करार करून संबंधीत यंत्रणेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे,असे कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिंदे यांनी केले आहे.यावेळी कारखान्याचे एक्झिकेटीव्ह डायरेक्टर प्रदिप पवार, वर्क्स मॅनेजर राजकुमार लवटे,प्रोडक्शन मॅनेजर श्रीकांत भावसर, शेती अधिकारी फकरुदिन जहागीरदार,उमेश पवार यांच्यासह इतर खाते प्रमुख व कारखान्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.