---Advertisement---

चपळगाव गटातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ शुगर तर्फे साखर वाटप

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२४ : धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर कारखान्यातर्फे ऊस उत्पादकांची दिवाळी गोड करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त चपळगाव गटातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति २० रुपये किलो दराने २० किलो साखर देण्यात येत असल्याची माहिती युवानेते बसवराज बाणेगाव यांनी दिली आहे. कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे, कार्यकारी संचालक कपिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. सोमवारी, अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे चपळगाव गट कार्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या वर्षी कारखान्याला ऊस घातलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे.याचा लाभ शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असून शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.यावेळी महादेव वाले,भीमाशंकर दुलंगे यांच्यासह बावकरवाडी,दहिटणे, चपळगाव ,मोट्याळ, सिंदखेड येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!