ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट बस स्थानकातून महिलेची पर्स पळवून सोने लंपास

अक्कलकोट  : अक्कलकोट बसस्थानकात आलेल्या हुबळी येथील महिलेच्या पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारत १ लाख २० हजारचे सोने लंपास केले आहे. ही घटना दि २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ च्या दरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की सुशीला नंदकुमार दोडीमनी वय ६० रा हुबळी जि धारवाड ह्या भाऊ कै. दत्तात्रय परशुराम जाधव रा कोन्हाळी ता अक्कलकोट यांच्या पुण्यतिथी करीता अक्कलकोट येथे आले असता अक्कलकोट बस स्थानकाच्या परिसरात आपल्या पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत ४५ हजार किंमतीचे दीड तोळ्यांची चैन व ७५ हजार किंमतीचे अडीच तोळ्यांचे गंठन असे १ लाख २० हजाराचे सोन्याचे दागिने अतिशय शिताफीने लंपास केले आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!