जळगाव : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून सुवर्णबाजारात सोने-चांदीच्या दरात चढ उतार सुरू आहे. शुक्रवार दि.२६ रोजी जळगाव सुवर्णबाजारात सोन्याचे ७२ हजार ७०० रुपये प्रतितोळा तर चांदी ८१ हजार ७०० रुपये असा होता. गुरूवार दि. २५ रोजी असलेल्या सोन्याचा भाव शुक्रवारी २०० रुपयांनी वाढला तर चांदीच्या दरात ३०० रुपयांची घसरण झाली.
सद्या लग्नसराईमुळे जोरदार सुरू असल्याने जळगाव सुवर्णबाजारात सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी ग्राहकांची चांगली गर्दी होत आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने व चांदीच्या भावात चढ-उतारामुळे जळगावच्या सुवर्णबाजारातदेखील सोन्याच्या भावात दररोज चढ उतार होत आहे. बुधवार दि.२४ रोजी सोने ७२ हजार ६०० रुपये प्रतितोळे, चांदी ८१ हजार रुपये किलो असे भाव होते, गुरुवार दि.२५ रोजी सोन्यात शंभर रुपयांची घसरण होऊन सोने ७२ हजार ५०० रुपये प्रतितोळा असे होते. तर बुधवारी चांदी ८१ हजार रुपये किलो होती तर गुरुवारी १ हजार रुपयांची वाढ होत चांदी ८२ हजार रुपये झाली होती.