ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोन्यासह चांदीच्या दराने केला विक्रम

जळगाव : वृत्तसंस्था

राज्यात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु झाली असताना अनेकांनी लग्नाच्यापूर्वी खरेदी सुरु केली असून आता सोने चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच जागतिक धोरणांमुळे शेअर, क्रिप्टो सोडून गुंतवणुकदारांनी सोने-चांदीत गुंतवणूक वाढवली आहे. त्याचे सराफा बाजारात पडसाद दिसत आहेत. सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दराने विक्रम केला आहे.

जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सराफा बाजाराच्या इतिहासात सोन्याचे विक्रमी दर पाहायला मिळत आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटी सह 88 हजार 475 रुपयांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर जीएसटीसह 99 हजार 910 रुपयांवर पोहोचले आहे.

सोना चांदीच्या विक्रमी दरामुळे सोन्या चांदीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेली असून सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या सर्व कारणांमुळे सोन्या चांदीच्या दराने विक्रम केल्याचा दावा सराफा व्यावसायिकांनी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!