ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गुड न्यूज : श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लवकरच २१४ पत्रकारांना मिळणार हक्काचे घर..!

सोलापूर प्रतिनिधी : समाजाचे प्रश्न प्रशासन व शासनासमोर मांडणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याचा आणि घराचा प्रश्न सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात आहे. पत्रकारांना भेडसावणाऱ्या या प्रश्नावर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने यशस्वी तोडगा काढला आहे. पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाचा आजारपणातील चांचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन लाखांपर्यतचे उपचार अकलेली मेडिकलेम कॅशलेस योजना राबविली जात आहे. दुसरीकडे पत्रकारांना सोलापुरात हक्काचे घर असावे यासाठी महाडाच्या माध्यमातून २१४ सदनिकांचा गृहप्रकल्प साकारला जात आहे.

हा प्रकल्प सध्या अंतिम टप्यात आहे.स्वतःच्या व कुटुंबामध्ये अचानकपणे येगाऱ्या आजारपणाच्या खर्चाबाबत सोलापुरातील २०० पत्रकार आज निर्धास्त आहेत. त्यांच्या खिशात दोन लगा रुपयांपर्यंतच्या उपचाराचे कार्ड आहे. या योजनेतून आतापर्यंत साढे तिन कोटीहून अधिक स्पयदि उपचार मोफतपणे पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांवर झाले आहेत. पत्रकारांच्या गृहप्रकल्पासाठी आम्ही २२ वर्षापासून संघर्ष करत आहोत.

सोलापुरातील धर्मवीर संभाजी महाराजतलाव परिसरात दोन एकरावर २३८ पत्रकारांचा गृह प्रकल्प साकारला जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २०१८ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन इाले. नंतरच्या काळात कोरोना महामारीसह अन्य कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब लागला. आता पुन्हा एकदा वा प्रकल्पाला गती मिळाली आहे. शासनाच्यावतीने पत्रकारांसाठी एकदाचा मोठ्या प्रमाणात साकारला जाणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्याने पदोपदी अडथळे आले. या अडवच्यांवर मात करून पुढे जाण्यासाठी जिल्ह्यातीस आमदारांसह राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष बदुभाऊ जोशी यांची मोठी मदत झाल्याचेही अध्यक्ष खेलकुडे यांनी सांगितले. सोलापूरचा हा गृहप्रकल्प आगामी काळात राज्यातील संथांसाठी दिशादर्शक प्रकल्प इतर पत्रकार ठरेल, असा विश्वासही अध्यक्ष खेलखुडे यांनी व्यक्त केला.

कॅशलेस मेडिक्लेम योजनेतून पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी पत्रकार संघ उभा राहत असत्याचे समाधान आहे. भविष्यात काकार संघात कोणीही पदाधिकारी रााहते, ही योजना बंद पडली नाही पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत साधारणतः सात ते आठ महिन्यांत पत्रकारांना त्यांच्या हक्काच्या पाण्या चाज्या मिळतील.
– विक्रम खेतबुडे, अध्यक्ष, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ

कायमस्वरूपी मेडिक्लेमसाठी प्रयत्न :
पत्रकार, त्याची पत्नी, दोन मुले, आई-वडील किंवा सासू-सासरे अशा सहा जणांचा समावेश असलेल्या मेडिक्लेम कॅशलेस योजना पत्रकार संघातर्फे १३ वर्षापासून राबविली जात आहे. या योजनेच्या प्रीमियची ५० टक्के रक्कम पत्रकार संघ देतो. भविष्यातही ही योजना सुरू राहावी यासाठी आतापासून मदत निधी उभारणे आवश्यक आहे. मदत निधी राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवून, व्याजावर ही योजना चालविण्याचा प्रयत्न असल्याचेही अध्यक्ष खेलबुडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!