ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महिलांसाठी आनंदाची बातमी ! एसटी प्रवासात मिळणार आजपासून ५० टक्के सवलत, शासन आदेश जारी

मुंबई : राज्य शासनाने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट जाहीर केली होती. या निर्णयाचा आदेश शासनाने काढला असून आज पासून ५० टक्के सवलतीचा लाभ महिलांना घेता येणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अनेक घोषणा केल्या. यातील महत्वाची म्हणजे,महिला सन्मान योजना असून या अंतर्गत एसटी प्रवासात ५० टक्के सवलत हा महत्वाचा निर्णय होता. याची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

दरम्यान राज्य सरकारने याबाबतचचा अध्यादेश काढला असून आज पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आजपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याच्या या योजनेच्या अंमलबजवणीला सुरुवात होणार आहे. ही रक्कम दरवर्षी राज्य शासन महामंडळाला देणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!