अक्कलकोटमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे एक महिन्यात सुरू करणार, नूतन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची ग्वाही
अक्कलकोट, दि.२२ : कोरोनाचे संकटमुक्ती बरोबरच कायदा आणि सुव्यवस्था तर राखली जाईलच पण येणाऱ्या एक महिन्यात शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात येतील,या कामी पत्रकारांनीही सहकार्य करावे असे आवाहन नूतन पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केले. पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांची बदली झाल्यानंतर पवार यांनी पदभार घेताच गुरुवारी, पत्रकार संघटनेच्यावतीने त्यांचा
सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकारांनी सीसीटीव्ही कॅमेरे चालू करावेत स्पीकर यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी केली.कोरोना संकट काळात पोलिस यंत्रणा जीव धोक्यात घालून अहोरात्र झटत आहे जनतेनेही सहकार्य करावे तसेच पत्रकारांनी जनजागृती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पवार म्हणाले, मुंबईतील अनुभव माझ्या गाठीशी आहे.कायदा सुव्यवस्था राखली जाईल.
पहिल्यांदा समजून सांगितले जाईल शब्दांनी समजत नसेल तर कायद्याचा बडगा उचलला जाईल. सभ्यतेच्या आड कोणी चूकीचे काम करीत असेल तर त्यांना सरळ केले जाईल,अशी ग्वाही देत असतानाच जनतेनेही सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी उल्लेखनीय कार्याबद्दल गोपनीय शाखेचे धनराज शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ
पत्रकार बाबासाहेब निंबाळकर, मारूती बावडे,योगेश कबाडे, शिवानंद फुलारी ,सैदपा इंगळे, रविकांत धनशेट्टी बसवराज बिराजदार , दयानंद दणूरे उपस्थित होते.