ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिंदुत्वाच्या बाबतीत सरकारला काही घेणं-देणं नाही, मंदिरांपेक्षा मदिरेचीच त्यांना अधिक चिंता – विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर ठाकरे सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्यास परवानगी दिली. मात्र धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यसरकारवर केली आहे. हिंदुत्वाच्या बाबतीत सरकारला काही घेणं-देणं नाही, मंदिरांपेक्षा मदिरेचीच त्यांना चिंता अधिक भेडसावत आहे, असे दरेकर म्हंटल आहे.

राज्य सरकारची मंदिराबाबत भूमिका स्पष्ट नाही. सरकारला हिंदुत्वाच्या बाबतीत देणे-घेणे नाही. देव-दैवतांच्या संदर्भात सुद्धा काही पडलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत लोकांना दैवतांच्या पायाशी मनःशांती मिळते. अनेक परंपरागत व्यवसाय आहेत. पुजारी, नारळ वाले, हार वाले आदींवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकारने याचा सर्वार्थाने विचार घेऊन मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यायला हवा. भाजपने अनेक आंदोलने केली. परंतु, सरकारला पाझर फुटत नाही. सरकार मंदिरं उघडायला तयार नाही असेही देरकर म्हणाले.

आज देव दैवत कड्या-कुलुपात आहेत. एका बाजूला रेस्टॉरंट, बार, वाईन शॉप चालू करत आहेत. डान्सबारमधील गर्दीत थय्या थय्या सुरु आहे. मंत्रालयात नुकताच बाटल्यांचा खच सापडला. मदिरेची जेवढी काळजी घेतली जात आहे त्यावरून मंत्रालयाचे मदिरालय झाले आहे की काय? असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!