ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनाचे कारण पुढे करून पळपुटे सरकार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत आहे:आमदार विजयकुमार देशमुख. 

सोलापूर दि.११ मार्च : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) यांनी एका नोटीफीकेशनव्दारे दि. 14 मार्च 2021 रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलली आहे.त्यामुळे MPSC स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. गेल्या काही वर्षापासून हे विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करून परिक्षेची तयारी करत आहेेत.तसेच काही विदयार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पूणे, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी अनेक महिन्यांपासून वास्तव्य करीत आहेत. त्यासाठी त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत.

तरी सुध्दा हे विद्यार्थी अगदी मनापासून राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परिक्षेची तयारी करीत आहेत. परंतू महाभकास आघाडीच्या पळपुट्या सरकारने आज अचानक महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) एका नोटीफीकेशनव्दारे ही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले या अगोदरही चार वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेेत कोरोना चे कारण पुढे करून महाभकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत आहे या महाभकास सरकारचा मी जाहीर निषेध करतो ठरलेल्या तारखे नुसारच खबरदारीचेे सर्व उपाय अमलात आणूूून परीक्षा घेण्यात याव्यात परिक्षा पुढे ढकल्यामुळे विदयार्थ्यांमध्ये एवढे दिवस आपण केलेली मेहनत वाया जाते की काय अशी भावना निर्माण होवून असंतोष निर्माण झालेला आहे.

त्यामुळे ते विद्यार्थी पुण्यामध्ये व महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव करून आंदोलन करीत आहेत.राज्य सरकारने या आंदोलनाची त्वरीत दखल घेवून दिनांक 14 मार्च 2021 रोजी ठरलेल्या वेळेत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) ची पूर्व परिक्षा घेण्यात यावी अन्यथा सरकारला यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!