ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पदवीधर आमदार अरुण लाड यांनी त्यांच्या स्वीय निधीतील तब्बल एक कोटींचा निधी वैद्यकीय सुविधेसाठी दिला

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात तब्बल एक कोटी रुपयांचे ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करणेत आले आहेत.

कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण वाढत असताना त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, कोणताही रुग्ण उपचाराआभावी दगावू नये म्हणून त्या त्या जिल्ह्यातील सर्व बाबींचा आढावा घेऊन आमदार अरुण लाड यांनी प्रत्येक जिल्ह्यातील शल्य चिकित्सकांशी चर्चा करून ही उपकरणे त्यांच्या स्वीय निधीतून पाचही जिल्ह्यातील त्यांच्या मतदार संघात उपलब्ध करुन देत आहेत.

आपल्या स्वीय निधीतील एवढा निधी केवळ वैद्यकीय सुविधेसाठी देणारे हे पहिलेच पदवीधर आमदार आहेत.
यापूर्वी विधिमंडळ सदस्यांना 50 लाखांपर्यंत वैद्यकीय सुविधेसाठी खर्च करणेत येत होते परंतु तो निधीही कोणाकडून खर्च केला जात न्हवता परंतु वाढीव तरतुदीत 1 कोटीं पर्यंत हा निधी खर्च करण्याची अनुमती दिली आणि सर्व च्या सर्व निधी वैद्यकीय सुविधेसाठी त्यांनी देऊ केला आहे. या त्यांच्या सुविधेमुळे प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा भक्कम होईल आणि सामन्यात नागरिकांना ही आपला जीव ऑक्सिजन अभावी गमवावा लागणार नाही.

“कोणताही रुग्ण ऑक्सिजन शिवाय दगावू नये यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. यापुढे ही प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा भक्कम करणेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत – आमदार अरुण लाड”

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!