ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये उद्या ‘डी ग्रीन व्हिलेज’ रिसॉर्टचे भव्य उदघाटन, मान्यवरांची उपस्थिती

मारुती बावडे

अक्कलकोट ,दि.२३ : अक्कलकोट शहरात नव्याने निर्माण झालेल्या सोलापूर रोडवरील भव्य दिव्य ‘डी ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट’ चा उद्घाटन सोहळा गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. मुख्य प्रवेशद्वार,आय लव अक्कलकोटचे सेल्फी पॉइंट, बिल्व प्युअर व्हेज रेस्टॉरंट, वटवृक्ष भव्य ओपन लोन व गार्डन, भव्य एसी हॉल, एसी रूम, २४ तास गरम पाण्याची सोय, एक्झिक्युटीव्ह रूम्स, एसी कॉटेज रूम्स, दोन स्विमिंग पूलसह पुरुष आणि महिला व लहान मुलांसाठी वेगवेगळी सोय अशा अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त असलेल्या डी ग्रीन व्हिलेज रिसॉर्टची अक्कलकोटसह भाविकांना मोठी उत्सुकता आहे.

हे रिसॉर्ट अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. उद्या होणाऱ्या कार्यक्रमात श्री मौनतपस्वी म. नि. प्र. जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी, विरक्त मठ निंबाळ यांची पाद्यपूजा होईल. त्यानंतर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते रिसॉर्टचे उद्घाटन होईल.

यावेळी म. नि. प्र. बसवलिंग महास्वामीजी, म.नि. प्र. अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी, म.नि.प्र प्रभूशांत महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, बँक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर दत्तात्रय कावेरी, मुख्याधिकारी सचिन पाटील,उपकार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी रिसॉर्टकडून स्वामीनाथ हिप्परगी, विलास कोरे, गजानन पाटील, राजशेखर हिप्परगी, दिनेश पाटील, ओंकार कोरे, हिम्मत पटेल, दत्तात्रय पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रीन व्हिलेज रिसॉर्टच्यावतीने देण्यात आली. रिसॉर्टसाठी आर्किटेक्ट म्हणून वीरेंद्र बोलाबत्तीन, सिव्हिल इंजिनियर म्हणून किरण पाटील, साईट इंजिनिअरिंग म्हणून राजकुमार कुंभार यांनी काम पाहिले आहे. अक्कलकोट शहरापासून अतिशय कमी अंतरावर सुसज्ज असे रिसॉर्ट उभे राहिल्याने अक्कलकोटकरांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!