दुधनी : मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे व गुरूशातलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय दुधनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीवतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बार्टी कार्यालयाच्यावतीने समता दुत तालुका -अक्कलकोट नालंदा चंदनशिवे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य व शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यीना सांगितले व तसेच समाजकल्याण व बार्टीकडून राबविल्या जाणाऱ्या योजना जातपडताळणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रास्ताविक प्रा. हविनाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणा विषयी धोरण विद्यार्थ्यांना माहिती दिले व समता पर्व अभियानाची सांगता करण्यात आली. आभार प्रदर्शन बंद्राड सर संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन शेंडे केले. तसेच या अभिवादनास महाविद्यालयातील उपप्राचार्य देसाई सर, गोगाव सर, मुनोळे सर, गद्दी सर, रेवतगांव सर व इतर शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.